काय मित्रांनो मग, आलात तर ब्लॉग वर तर मग समजून घेऊया थोडक्यात ओळख माझ्या मते संगणक आता 2022 मध्ये सर्वजण वापरतात. मग आपण सुद्धा वापरावे ही माझी इच्छा आहे. इच्छा काय तर बळजबरी च म्हणा की, का बरं वापरावे मंडळी आजकाल प्रत्येक जण इंटरनेट वापरत आहे, आणि इंटनेटच्या युगात मोबाईल आणि संगणक हे मुख्य दोन रूपे आहेत माझ्या मते भारतात 99 टक्के व्यक्ती मोबाईल वापरत आहे, आणि 60 टक्के व्यक्ती संगणकावर आहे , येणाऱ्या 2 ते 3 वर्षात संगणक 90 टक्के होऊ शकते, मग जर आपल्याला याविषयी काहीच माहिती नसेल तर मग ते दुर्दैव म्हणावे लागेल.
आता हा ब्लॉग मी कश्यासाठी चालू केला तर माझ्या मराठी माणसाला याविषयी जागरूकता असावी म्हणून.
या ब्लॉग वर आपण काय शिकणार आहे पुढील प्रमाणे
काही गोष्टी शिकणार आहेत ते आपल्या मातृ भाषेत.
आणि ते सुद्धा चित्रावरून वा आहे ना मजेदार
- भाषा Coding जसे की Java, C+, C++, HTML,CSS, Php
- Software, MS Office 2020, Tally Prime, Photoshop, Premiure Pro, Corel Draw, आणखी बरेच काही,
- हार्डवेअर, जसे की CPU, Hard Disk, Sad, Ram, Graphic Card, SMPS, इ.
मित्रांनो तर मग आता हे तर आपण नुसते शिकणार नाही तर जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे मी फोटो व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे. आजकाल खूप सारे क्लासेस लाऊन सुद्धा कोणीही इतक्या छान पद्धतीने शिकवत नाही पण मी द्यास उचलला आहे मराठी माणसासाठी, तुमच्याकडून माझी काय अपेक्षा असणार फक्त शेअर करा आपल्या ब्लॉग ला मग बघा मराठी पाऊल कसे पडते पुढे...
जय महाराष्ट्र,
Sagar Borkar
Email- borkar615@gmail.com
0 Comments